मानवाधिकार सामाजिक न्याय सुरक्षा संघटन स्थापना : 2026.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष - संदेश गोपनारायण सामाजिक कार्यकर्ते समाजातील गरजू, वंचित आणि पीडित घटकांच्या हक्कांसाठी कार्य करणारे व्यक्तीमत्त्व, अन्याय विरुद्ध आवाज उठवणारे.
मानवाधिकार सामाजिक न्याय सुरक्षा संघटन स्थापनेचा आमचा उद्देश समाजातील प्रत्येक नागरिकाला न्याय, सुरक्षा आणि सन्मान मिळावा हा आहे. समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे आणि गरजू लोकांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य देणे ही आजची गरज आहे.
समाजातील गरजू, वंचित आणि पीडित घटकांच्या हक्कांसाठी कार्य करणारी सामाजिक संघटना. मानवाधिकार संरक्षण, सामाजिक न्याय आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
भूमिका
ज्या अर्थी, मानव कुटुंबातील सर्व व्यक्तींची स्वाभाविक प्रतिष्ठा व त्यांचे समान, व अहरणीय अधिकारांना मान्यता देणे, हा जगांत स्वातंत्र्य, न्याय व शांतता यांच्या प्रस्थापनेचा पाया होय,ज्या अर्थी, मानवी अधिकारांची अवहेलना व अप्रतिष्ठा झाल्याने अमानुष कृत्ये घडून आली आणि त्यायोगे मानवजातीच्या सद्विवेकबुद्धीवर भयंकर आघात झाला आहे, आणि म्हणून मानवांना भाषण स्वातंत्र्याचा व श्रद्धास्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल, व भीलवी गरज यांपासून त्यांची मुक्तता होईल, अशा जगाची उभारणी करणे, ही, सामान्य लोकांची सर्वोच्च आकांक्षा म्हणून घोषित करण्यात आली आहे.ज्या अर्थी, जुलूम व दडपशाही यांविरुद्ध अखेर चा उपाय म्हणून, मानवाला, बंड करणे भाग पडू नये यासाठी मानवी अधिकाराचे संरक्षण कायद्याने करणे अत्यावश्यक आहे.ज्या अर्थी, राष्ट्र राष्ट्रांमध्ये मित्रत्वाचे संबंध वृद्धिंगत करण्याच्या कार्यास चालना देणे अत्यावश्यक आहे.ज्या अर्थी, संयुक्त राष्ट्रसंघटनेतील सदस्य राष्ट्रांनी सनदेत, मूलभूत मानवी अधिकार, मानवाची प्रतिष्ठा व महत्व, स्त्रीपुरुषांचे समान अधिकार यांवरील त्यांचा आपवी श्रद्धा निश्यपूर्वक पुन्हा व्यक्त केली आहे आणि अधिकाधिक स्वातंत्र्याच्या वातावरणात, सामाजिक प्रगती, घडवून आणण्याचा व जीवनमान सुधारण्याचा निर्धार केला आहे,ज्या अर्थी, सदस्य राष्ट्रांनी, संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सहकार्याने, मानवी अधिकारांना व मूलभूत स्वातंत्र्यास जागतिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्पाचे, आणि त्यांचे पालन करण्याचे ध्येय साध्य करण्याची, प्रतिज्ञा केली आहे.ज्याअर्थी, या प्रतिज्ञेच्या परिपूर्तीसाठी, उक्त अधिकार व सार्वत्रिक सर्व प्रकारचे स्वातंत्र्य यांच्याबाबत जाणीव होणे, अत्यंत महत्त्वाचे आहे,त्या अर्धी आता ही साधारण सभा, हा मानवी अधिकारांचा जागतिक जाहीरनामासर्व लोकांसाठी, ध्येय सिद्धीचा एक समान आदर्श म्हणून उद्घोषित करते व त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व समाजातील प्रत्येक घटकाने हा जाहीरनामा सतत डोळ्यापुढे ठेवून, अध्यापन व शिक्षण यांच्या द्वारे या अधिकारांचा व स्वातंत्र्याचा मान, राखला जाण्यासाठी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा प्रागतिक स्वरूपाच्या, उपाय योजनांच्या द्वारे, सदस्य राष्ट्रांच्या लोकांमध्ये व त्यांच्या क्षेत्राधिकाराखालील प्रदेशांतील लोकांमध्ये त्यांना जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी व त्यांचे परिणाम कारक पालन केले जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
