राष्ट्रीय अध्यक्ष – संदेश गोपनारायण
असंघटित कामगार क्षेत्रातील कामगारांसाठी त्यांच्या किमान वेतनासाठी त्यांच्या आरोग्याची सुरक्षा यांच्या बद्दल त्यांना सहायक कामगार आयुक्त यांच्याकडून न्याय मिळवून दिला तसेच बांधकाम कामगार यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप, कामगारांचे मृत्यूचे क्लेम, आरोग्य तपासणी, कामगाराचा विमा, सुरक्षा संच, गृहउपयोगि संच इत्यादी अनेक कल्याणकारी योजनेचा त्यांना कामगार विभाग यांच्याकडून न्याय मिळवून दिला तसेच ग्रामीण भागातील जिल्ह्यातील पाण्याच्या टंचाई विशेष प्रयत्न करून आणि टंचाईमुक्त गाव खारपाणपट्ट्यातील केलेले आहे जिल्हा परिषद पंचायत समिती विभागाकडून अनेक गरजू गरीब लोकांना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलन शिक्षण विभागाच्या विरुद्ध करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला पर्यावरनाच संवर्धन झाडे लावणे आणि झाडे जगवणे याच्यासाठी दरवर्षी विशेष मोहीम राबविणे , दिव्यांग दुर्धर आजार पीडित वृद्धांसाठी शासनाच्या विविध योजना सेवानिवृत्त पेन्शन योजना इत्यादी अनेक कल्याणकारी योजनेचा त्यांना प्रशासनाच्या एकूण लाभ मिळवून दिला समाजकार्याची विशेष आवड असल्यामुळे अविरत विश्रांतीने घेता सतत परिश्रम संघर्ष करून शोषित पीडित लोकांना न्याय मिळवून देऊन भारतीय राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार सर्व नागरिकांना मिळून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून समाजातल्या शेवटच्या घटका पर्यंत पोहोचणे हे माझे उद्दिष्ट आहे.